। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातून जाणार्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर नेरळ कडे जाणार्या रस्त्यावर लावलेले नामफलक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी बदलले आहेत. नेरळकडे जाणार्या रस्त्यावर कृषी पर्यटन केंद्र असलेल्या सगुणाबागकडे असे नाव देखील होते आणि त्या नावाला राहस्त्रवाडी युवक काँग्रेस ने आक्षेप घेतला होता. दरम्यान,एमएसआरडीसीने पोही फाटा येथील नाक्यावरील असलेल्या नामफलकावरून सगुणाबाग हे नाव हटवले आहे,पण हुतात्मा हिराजी पाटील स्मारकाकडे अशी मागणी अद्याप मान्य केली नाही.
शहापुर-मुरबाड-कर्जत-खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग कर्जत तालुक्यातून जात आहे. या राष्ट्रीय महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यावर कर्जत तालुक्यातील पोही येथे नेरळ कडे जाणार्या रस्त्याचा भाग वळतो. त्या रस्त्यावरील महत्वाच्या गावांची माहिती देण्याचा प्रयत्न एमएसआरडीसी कडून फलक लावून दिले गेले आहेत.त्या पोही फाट्यावरील फलकावर नेरळ रस्त्यावरील मानिवली येथे असलेल्या हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक आहे.त्या स्मारकाचा उल्लेख एमएसआरडीसीने त्याबाबत आपल्या फलकावर कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.मात्र तेथे व्यवसाय करणार्या सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्राचे नाव मात्र येथे फलकावर जाहीरपणे टाकले गेले होते. त्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने आक्षेप घेताना सगुणाबाग या नावाऐवजी हुतात्मा हिराजी पाटील स्मारकाकडे असे नाव असावे अशी मागणी करण्यात आली होती.
सागर शेळके यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ यांना निवेदन देत 20 दिवसात सगुणाबाग यांचे नाव बदलले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन करील असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने कार्यवाही करीत पोही फाट्यावरील आपल्या फलकावर सगुणाबाग हे नाव काढून टाकले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशार्यानंतर सगुणाबागेचे नाव त्या फलकावरून काढणार्या राज्य रस्ते विकास महामंडळाने देशासाठीआपले प्राण गमावणार्या स्थानिक सुपुत्र हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे नाव मात्र तेथे लिहिले नाही.