। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील माथेरान- कळंब रस्त्यावर युवराज रेसिडेन्सी समोरील रस्त्याचे चार वर्षानंतर काँक्रीटीकरण केले गेले आहे. त्या रस्त्यावर केलेले काँक्रीटीकरण कामामुळे आता तेथे रस्ता धोकादायक बनला आहे. त्या रस्त्यावर पोहचण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला क्लीन चिट देऊन त्या रस्त्यावर जाण्यासाठी रस्ता सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करताना दिसत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
माथेरान- नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर तेथील युवराज रेसिडेन्सी समोरील निर्माण नगरी येथील रस्ता सिमेंट काँक्रीटचा रस्ता चार वर्षांपूर्वी बांधला जाणार होता. तेथील 200 मीटर लांबीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग बांधणार होता,पण तीन वर्षे त्या रस्त्याकडे बघायला वेळ नव्हता. मात्र स्थानिकांनी उपोषणे आंदोलने केली आणि त्यानंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली. गेली तीन महिन्यानंतर हा रस्ता झाला असून आता त्या रस्त्यावर पोहचण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.नव्याने बनवलेला रस्ता हा जमिनीपासून दीड फूट उंच आहे.त्यामुळे त्या नवीन रस्त्यावर जाण्यासाठी वाहनचालक यांना कसरत करीत रस्त्यावर पोहचावे लागते.
त्यामुळे धोकादायक बनलेल्या नवीन काँक्रीट रस्त्यावर जाण्याचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून बनवून गेहतला नाही. त्यामुले वाहनचालक यांची कसरत सुरु असते. मात्र गेली महिनाभर असे सुरु असताना सुद्धा सार्वजनाईक बांधकाम विभागाकडून ठेकेदार कंपनीला त्याबाबत सूचना केली जात नाही. मात्र रस्त्यावर पोहचण्यासाठी प्रामुख्याने दुचाकी चालक यांना करावी लागणार कसरत लक्षात घेऊन देखील बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.