समिती प्रशिक्षणाची सांगता
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड जंजिरा नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मध्ये शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मान्यवर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोदर खरगावक़र, रोहिणी सावकार, उमेश बैकर,आशिल ठाकुर, सुप्रीया रहाटे, अनघा चौलकर, राजश्री गजने, महेंद्र हावरे राजेश भोईर, अनघा चौलकर, कल्पना पेणकर, राजश्री गजने, आरती थोरवे, खलीदा नाखुदा,राजश्री गजने, महेंद्र हावरे उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठन व्यवस्थापन समितीची कर्तव्य आणि जबाबदारी,या विषयाअंतर्गत शासनाच्या विद्यार्थ्यांना मिळणार्या योजनेत असणार्या बाबी, बालकांचे ह व संरक्षण,शाळा विकास आराखडा, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण आपत्ती व्यवस्थापन या विषयीचे उदाहरणासह उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले.
हे प्रशिक्षण 14 ते 15 मार्च या दोन दिवसाच्या कालावधीत संपन्न झाले.