गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप

1 लाख 57 हजार 612 गणपतीमूर्तींची विक्री; 15 कोटी 74 लाख 59 हजार रुपयांची उलाढाल

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढकारातून उमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक थैर्य प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवात जिल्ह्यातील सुमारे 247 बचतगटांतील महिलांनी 1 लाख 57 हजार 612 गणेशमूर्तींची विक्री केली आहे. यातून तब्बल 15 कोटी 74 लाख 59 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

रायगड जिल्ह्यात नुकताच गणेशोत्सव उत्साहात पार पडला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीव काम, रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना खास ओळख प्राप्त झाली असून, गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महिला बचतगटही उतरले आहेत.

या व्यवसायासाठी ‌‘उमेद‌’ अभियानामार्फत महिला बचतगटांना फिरता निधी तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात येतो. यामुळे महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. गणेशोत्सवात जिल्ह्यातील सुमारे 247 बचतगटातील महिलांनी 1 लाख 57 हजार 612 गणपतीमूर्तींची विक्री केली आहे. यातून तब्बल 15 कोटी 74 लाख 59 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. त्या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण होऊन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करता येत आहे.

तालुका विक्री केलेल्या मूर्तीची संख्या एकूण उलाढाल
अलिबाग 328 781000 रु
कर्जत 6141343000 रु.
खालापूर 350 1975000 रु.
महाड 70 175000 रु.
माणगाव 2125 3475000 रु.
मुरुड 2060 3365000 रु.
पनवेल 180 500000 रु.
पेण 149505 142755000 रु.
रोहा 195390000 रु.
श्रीवर्धन 240460000 रु.
सुधागड 600800000 रु
तळा 150280000 रु.
उरण 5951160000 रु.
एकूण 1,57,612 15,74,59,000 रु.


Exit mobile version