। पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील ओवळे गावात शिवजयंतीनिमित्ताने डिजिटल बोर्ड व सेल्फी पॉईंटचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते डिजिटल बोर्ड व सेल्फि पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी अतुल भगत व सचिन गोळे, आदिती सोनार, दिपक कांबळी, अविनाश पडवळ, प्रसाद परब यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अतुल भगत व सचिन गोळे यांच्यासह आदी मान्यवरांनी कुंडेवहाळच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.