| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड विभागीय स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा वन भोजनाचा कार्यक्रम रविवारी (दि. 28) पुगाव येथे आयोजित आला होता. या वार्षिक स्नेहसंमेलनाला तसेच वन भोजनाला भरभरून प्रतिसाद देत विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवात श्री गणेश प्रतिमेचे पूजन तसेच वर्षभरात निधन झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमास तीनशेहून अधिक ज्येष्ठ नागरीकांनी उपस्थीत दर्शविली.
अध्यक्ष मारुती राऊत, आशोक कदम, केशव महाबळे, प्रवीण गांधी, गोरखनाथ कुर्ले, प्रणिता गांधी, विश्वनाथ धामणसे, नारायण धनवी, यानी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मारुती राऊत, कार्याध्यक्ष प्रविण गांधी, उपाध्यक्ष महादेव महाबळे, सह चिटणीस पांडुरंग सानप, खजिनदार केशव महाबळे, गोरखनाथ कुर्ले, नंदकुमार पवार, धनाजी घोणे, लक्ष्मण कदम, बळीराम ठोंबरे, हरिचंद्र जाधव, अशोक कदम, तसेच सर्व जेष्ठ नागरिक तसेच उपस्थित महिलांनी अथक परिश्रम घेतले.