पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांचे प्रतिपादन
| रोहा | वार्ताहर |
तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना निरनिराळे स्तुत्य उपक्रम संघटनेचे अध्यक्ष पी.बी. सरफळे रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे करीत आहे. या संघटनेच्या सदस्यांना समाजात मानाचे स्थान असून, त्यांच्या वयाचा विचार करता निरनिराळ्या ठिकाणी सौजन्यशिलतेची वागणूक मिळेल. बँका, रुग्णालये तसेच प्रवासात त्यांना प्राधान्य मिळवून देण्यासाठी आमच्या पोलीस दलातर्फे नेहमीच प्रयत्न राहील. ज्येष्ठ नागरिक हा समाजातील मोठा घटक आहे, असे रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पी. बी. सरफळे रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. देविदास मुपडे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी संघटनेचे सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील, प्रमुख सदस्य अंनत पाटणकर, शरद गुडेकर, सुधाकर गडकरी, प्रकाश पाटील, नंदकुमार भादेकर, भारत करंबे, चंद्रकांत गावडे, सुरेश मेथा, प्रदीप साखळकर, अरुण देशमुख आणि चिमण सोळंकी आदी सदस्य उपस्थित होते.
या भेटीदरम्यान अध्यक्ष पी. बी. सरफळे रावसाहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या पोलीस निरीक्षक यांच्याकडे विशद केल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना समाजात वावरताना येणार्या अडचणी आरोग्य आणि तातडीची कोणतीही मदत दिली जाईल. अलर्ट सिस्टीम म्हणून मोबाईलची व्यवस्था केली आहे. इमर्जन्सीसाठी तप्तरतेने सेवा पुरविली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी दिले. यावेळी पी. बी. सरफळे यांनी समाधान व्यक्त केले. सुरेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.