। मुंबई । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोनाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला. त्यानंतर फुप्फुसातील संसर्ग झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तीन वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.