शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते दामू बटवले यांचे निधन

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते दामू बाबू बटवले यांचे रविवार दि.12 जून रोजी राहते घरी न्हावे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 84 वर्षांचे होते. त्याच्या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, एक सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बटवले कुटुंबियांबरोबरच न्हावे गावावर तसेच माणगाव तालुका शेकाप व रमेश मोरे मित्रमंडळावर शोककळा पसरली आहे. बटवले हे माणगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्यावर न्हावे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. बटवले यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.21 जून रोजी तर उत्तरकार्य विधी गुरुवार दि.23 जून रोजी राहते घरी न्हावे येथे होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र बाबू बटवले यांनी दिली.

Exit mobile version