‌‘आईवडिलांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा’

| नेरळ | वार्ताहर |

आपल्या भावासाठी वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा न मागणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा पायंडा समाजासाठी अतिशय स्तुत्य आहे. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ सुरू केलेली ही सेवा पांडुरंगाची सेवा आहे.त्यामुळे या उपक्रमाचे आचरण समाजाने केले पाहिजे असे आवाहन देहू महाराज मेंगाळ यांनी केले.

नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात स्व. सुरेखा मधुकर खडे आणि माणिक हिरू पाटील यांच्या स्मरणार्थ महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी परशुराम महाराज खंडवी,कीर्तनकार शिवराम महाराज तुपे,नागो गवळी, विजय महाराज पाटील, लक्ष्मण हजारे, उर्मिला हजारे,वासंती राणे, शांताराम धुळे, शंकर विरले, दत्तू विरले, रमेश लदगे उपस्थित होते.

Exit mobile version