साडेसातशे लिटर डिझेलची चोरी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पाच डंपर मधून साडेसातशे लिटर डिझेलची चोरी केल्याप्रकरणी चोराविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात दि.3 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दत्ता केंद्रे हे पनवेल येथे राहत असून त्यांचा बालाजी ट्रान्सपोर्ट या नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे डंपर कल्पतरू इमारत साईट ऑफिस पनवेल येथे रोडवर पार्क करून ठेवले होते आणि चालक रूम मध्ये झोपी गेले. तीन एप्रिल रोजी सकाळी ते डंपर पार्क केलेल्या ठिकाणी पाहण्यासाठी गेले असता पाच डंपरच्या डिझेलच्या टाकीचे लॉक तोडले असल्याचे दिसून आले. त्यावेळेस साडेसातशे लिटर डिझेलची चोरी करण्यात आली.

Exit mobile version