| महाड | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. कांबळे तर्फे महाड मधील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी विलास पांडुरंग हुलालकर (48) राहणार वारंडोली नाते, सध्या ईसाने कांबळे येथे रहात होता. दुपारच्या सुमारास खाऊसाठी पैसे देण्याचं आमिष दाखवत सलूनमध्ये बोलावत 48 वर्षांच्या नराधमाने सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हुलालकर याला अटक करण्यात आले असून, पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.