| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईच्या बोरिवली परिसरात रविवारी (दि.20) एका 55 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणानंतर चिमुकली प्रचंड घाबरली होती. नंतर तिच्या पालकांनी पीडित चिमुकलीला प्रेमाने विचारले. तेव्हा तिने सगळी आपबिती सांगितली. यानंतर संतप्त पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नरधमाविरोधात गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राम ललित यादव असे आहे. थंड पाणी देण्याच्या बहाण्याने मुलीला त्याच्या झोपडीत बोलावून घेतलं. तसेच, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर ‘कुणाला सांगितल्यास ठार मारेन’ अशी चिमुकलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली. मुलगी घाबरतच आपल्या घरी निघून गेली. मुलीचे बदलेले वर्तन आणि सतत घाबरत असल्यामुळे चिमुकलीच्या पालकांना संशय आला. पालकांनी विचारपूस केली. मात्र, तरीही तिने काहीही सांगितले नाही. नंतर पालकांनी तिला प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा पीडित चिमुकलीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी चिमुकलीला एमएचबी पोलीस ठाण्यात नेले. यासह मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पोलिसांकडे नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.