। पुणे । प्रतिनिधी ।
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील माजी उपसरपंचाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 06) सकाळच्या सुमारास घडली. हनुमंत बबुशा कोयते (44) असे मृत उपसरपंचाचे नाव असून ते नेहमीप्रमाणे मित्रांसमवेत डोंगरावर राम कडा येथे चालण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. सोबत असलेल्या मित्रांनी तातडीने त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.