| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 5 असे एकूण 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरमुळे मध्यरात्रीच पाकड्यांची झोप उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या या हवाई स्ट्राईकमुळे पंजाबमधील लाहोर ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत चांगलाच हाहाकार माजला. गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे एकूण पाच टॉप कमांडरचा खात्मा झाला आहे. तर ऑपरेश सिंदूरचे तीन मोठे शिकार ठरलेल्यांची नावं फोटोसहित समोर आले आहेत. भारतीय सैन्याकडून हवाई हल्ला करत बहावलपूरमधील मसूद अजहर जो जैश हेडक्वॉर्टर नेस्तनाबूत केलं आहे. यासह मुरीदके येथील लष्कराचा प्रमुख हाफिज सईद याचा अड्डा देखील उद्ध्वस्त केला आहे. यासोबतच सियालकोट येथील हिजबूलचे कॅम्प टार्गेट सल्लाहुद्दीन याची देखील या हल्ल्यात शिकार झाली आहे.