| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आशिक जाधव (24) असे या तरुणाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. आशिक जाधव याने 17 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर त्यांने 15 एप्रिल रोजी व त्यानंतर अनेकवेळा मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलगी 6 आठवड्यांची गरोदर राहिली. डॉक्टरांनी याबाबतची माहिती खारघर पोलिसांना दिली.
खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार
