नैना प्रकल्प बाधितांच्या न्याय हक्कासाठी सहकार्य करणार- शरद पवार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सिडकोकडून राबविण्यात येत असलेल्या नैना प्रकल्प बाधितांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात 95 गाव नवी मुंबई, नैना आणि इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या सदस्यांनी सोमवारी (दि.27) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी नैना प्रकल्पबांधितांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले.

यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकुर, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, माजी सरपंच अनिल ढवळे, माजी नगरसेवक रविंद्र भगत, समितीचे सरचिटणीस ॲड. मदन गोवारी, वास्तूविशारद अतुल म्हात्रे उपस्थित होते.

या मागण्यांमध्ये पनवेल, उरण, नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बांधलेली रहिवासी, वाणिज्य वापरातील बांधकामे जेथे आहेत तेथे नियमित करावी. साडेबारा टक्के योजनेमार्फत प्राप्त भूखंडामधून बेकायदेशीर कपात पाऊणे चार टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत करावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरार -अलिबाग कॉरिडॉर, लॉजिस्ट्क्सि पार्क, महाऊर्जा प्रकल्प इत्यादी महत्वाच्या मागण्या संदर्भातही चर्चा केली.

चर्चेअंती शरद पवार यांनी लवकरच मुख्यमत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वास दिले. तसेच नैना प्रकल्पाविरोधात 6 डिसेंबरपासून आयोजित शेतकऱ्यांच्या उपोषणास सहकार्य करण्याचेही सांगितले.

Exit mobile version