। कर्जत । वार्ताहर ।
दादर परेल येथे झालेल्या ओपन महाराष्ट्र स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्जतमधील शारदा विद्या मंदिरच्या अकरा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंनी सुवर्णपदक आणि रौप्यपदक आणि कांस्यपदकाची कमाई केली. मुंबई येथे होणार्या तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झाली आहे. शारदा विद्या मंदिरच्या खेळाडूंनी यश प्राप्त करून स्वतःचे व शाळेचे नाव उज्वल केले असून या यशस्वी खेळाडूंच्या यशामुळेच रायगड जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरवले आहे.
या यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व सुनिल सावंत यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याचे जाहीर करुन शुभेच्छा दिल्या. या यशस्वी खेळाडूंच्या यशामागे शारदा विद्या मंदिर शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक सौरभ गुरव यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले आहे. प्रेम देशमुख-सुवर्ण, विहान पेरनेकर-सुवर्ण, सोहम विटकर-सुवर्ण, विनंती खडके-रौप्य, माही चौहान-रौप्य, मयूर जाधव -रौप्य, हिमांशू शिंदे-रौप्य, श्रावणी काळबडे-कांस्य, दक्ष नागावकर-कांस्य,कार्तिकी सरोदे -कांस्य, कबीर गायकवाड- कांस्य रायगड जिल्हा सचिव स्वप्नील अडुरकर व मोहिनी अडुरकर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद यांनी शुभेच्या दिल्या.