। कर्जत । प्रतिनिधी ।
मुंबईतील परळ येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कर्जतच्या शारदा विद्या मंदिरातील पाच खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सहभागी सर्व खेळाडूंनी सुवर्णपदक आणि रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्याचबरोबर मुंबई येथे होणार्या तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे. शारदा विद्या मंदिरच्या खेळाडूंनी यश प्राप्त करून स्वतःचे व शाळेचे नाव उज्वल केले असून या यशस्वी खेळाडूंच्या यशामुळेच रायगड जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकचे मानकरी ठरवले आहेत.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत विहान पेरनेकरने सुवर्णपदक, तर प्रेम देशमुख, विनंती खडके, माही चौहान आणि कबीर गायकवाड यांनी रौप्यपदक पटकावले आहे. या यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र तायक्वांडो असो.चे अध्यक्ष सुनिल सावंत यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या यशस्वी खेळाडूंच्या यशामागे शारदा विद्या मंदिर शाळेचे शिक्षक सौरभ गुरव यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले आहे.