| पनवेल | प्रतिनिधी |
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी (दि.5) पार पडल्या होत्या. सोमवारी (दि.6) लागलेल्या निकालात कोन आणि दूंदरे ग्रामपंचायतींवर शेकाप आघाडीचा झेंडा फडकला असून कोन ग्रामपंचतीत शेकाप महाविकास आघाडी कडून थेट सरपंच पदाच्या उमेदवार अश्विनी जितेश शिसवे या विजयी झाल्या, तर दूंदरे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार सुभाष भोपी विजयी झाले आहेत.