शेकापचा अल्पसंख्याक समाजाला नेहमीच पांठिबा – आ. जयंत पाटील

रेवदंडा पंचशील नगर येथे गौतम बुध्द मुर्ती समर्पण सोहळा
। रेवदंडा । महेंद्र खैरे ।
शेतकरी कामगार पक्षाचा अल्पसंख्याक मुस्लीम व दलित समाजाला नेहमीच पांठिबा आहे. तालुक्यातील 80 टक्के बौध्द समाज शेकापक्षात असून गौतम बुद्ध यांची शिकवण व प्रार्थना लहान मुलांना देत त्यांच्यावर संस्कार घडविणारे असे रेवदंडा पंचशील नगर असल्याचे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रेवदंडा पंचशील नगर येथे गौतम बुध्द मुर्ती समर्पण सोहळा सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रदिप नाईक, मनोज ओव्हाळ, विरेश कवाडे, कमळाकर वाघमोडे, ज्येष्ठ कार्यकर्ते कमळाकर साखळे, सदाशिव मोरे, शेकापक्ष तालुका चिटणीस सदस्य शरद वरसोलकर, डॉ. वरसोलकर, माजी ग्रा.पं.सदस्य सुरेश खोत, सरपंच मनिषा चुनेकर, ग्रा.पं.सदस्य राजन वाडकर, संदिप खोत, संतोष मोरे, खलिद तांडेल,सलिम गोंडेकर, प्रमोद नवखारकर, माजी सरपंच विजय चौलकर, निलेश खोत, किशोर मानकर, आनंद बळी, उमेश कोंडे, अनिल मुकादम, इक्बाल फटाकरे, असिफ गोंडेकर, अजित पाटील आदी शेकापक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पंचशील ग्रामस्थ व रमाई महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुकर गायकवाड यांनी केले. याप्रसंगी रेवदंडा पंचशील ग्रामस्थ व महिलांच्यावतीने अध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी आ. जयंतभाई पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी आ. जयंत पाटील मार्गदर्शन करताना सांगितल कि, शेकापने आजपर्यंत सर्वधर्म समभाव ही भावना ठेवून काम केले आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता शेकाप विकासकामे करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घरातील संबध होते. ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहली त्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पेझारी निवासस्थानी येवून गेले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंचशील नगरचे अध्यक्ष मधुकर गायकवाड, उपाध्यक्ष नितिन गायकवाड, सचिन पवार, अमोल गायकवाड, गौरव गायकवाड, रत्नदीप गायकवाड, विलास धाटावकर, सागर गाडे, किशोर गायकवाड आदीने विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version