शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित मानाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे हे 20 वे वर्षे असून यंदा 52 गोविंदा पथकाने सहभाग नोंदविला आहे. दहीहंडी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली असून आज (दि.7) दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शेतकरी भवन समोर दहहंडी फोडण्याचा थरार पहावयास मिळणार आहे. आधुनिकतेच्या बदलानुसार प्रत्येकाच्या घराघरात दहीहंडीचा कार्यक्रम पोहचिवण्याचे काम आयोजकांनी केले आहे. यंदा यु टयूबद्वारे नागरिकांना घरबसल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.