देवीदास गणपत म्हात्रे, शे.का.प. ज्येष्ठ कार्यकर्ते, पेण-वढाव
शेकापने नेहमीच अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवत वंचित-शोषितांचे असंख्य प्रश्न रस्त्यावर उतरुन सोडविले आहेत. शेकाप आजतागायत जनतेच्या अडीअडचणीच्या काळात त्यांना साथ देण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिला आहे. म्हणूनच पक्षाची नाळ तळागाळातील सर्वसामान्यापर्यंत जुळली आहे. जेव्हा जेव्हा जनसमुदायांच्या मागण्यांना ठोस उत्तरे मिळाली नाही, तेव्हा सरकारच्या दारातच काय, रस्त्यावर येऊन ठाण मांडून आवाज उठविण्याचे कामही शेकापच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. असे कित्येक प्रदीर्घ लढे शेकापने लढविले आहेत, त्या आंदोलनांचा इतिहासच साक्षीदार आहे.




आठवण शेकापच्या शिलेदारांची
शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापनदिन 2 ऑगस्ट 2022 ला वडखळ येथे साजरा होत आहे. या कष्टकरी, शेतमजूर, कामगार, वंचित बहुजन यांच्यासाठी विधानसभेत, विधानपरिषदेत, लोकसभेत जाऊन प्रसंगी रोजगार, पाणी याव्यतिरिक्त रोहा तसेच भूमीहिनांसाठी कारखान्यात काम करणार्या कामगाराला आरोग्य सुविधा व इतर सुविधांसाठी प्रयत्न केले. सेझ, बुडीत अर्बन बँक पेणसारख्या बँकांतील पैसे कामगार, छोटे-मोठे भाजीचे व्यापारी, कष्टकरी यांना पैसे मिळवून देण्यासाठी मोर्चे, उपोषणे या पक्षाच्या नेत्यांनी काढले व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या शिलेदारांना 75 व्या 2 ऑगस्ट 2022 च्या वर्धापन दिनानिमित्ताने लाल सलाम!