तळा येथे शेकापने कंबर कसली

आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक
। तळा । वार्ताहर ।
तळा येथे शेतकरी कामगार पक्षाची आढावा बैठक शुक्रवारी (दि.8)शाखा कार्यालयात भरविण्यात आली होती. या बैठकीला रायगड जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषद पक्षप्रतोद अ‍ॅड.आस्वाद पाटील उपस्थित होते.
यावेळी पिटसई मुळगाव, पिटसई बौद्धवाडी, बोरभाटला आदिवासीवाडी, खांबवली आदिवासीवाडी, महुरे बौद्धवाडी, कुंभळेकोंड, वानस्ते, बौद्धवाडी, येथिल अनेकांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेशकर्त्याचे जिल्हा परिषद शेकाप पक्षप्रतोद आस्वाद पाटील यांनी पक्षात स्वागत केले. पक्ष प्रवेशाने आगामी तळा नगरपंचायत व ग्रामपंचायती निवडणूकीत शेकापला निश्‍चितच बळ मिळणार आहे.
यावेळी तालुका चिटणीस धनराज गायकवाड, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर खरेदी विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्‍वर भोईर, माजी चिटणीस दिपक रसाळ, लक्ष्मण शिंदे, खरवली उपसरपंच सकपाल, लहु चव्हाण, महंमद परदेशी, कानू विचारे, गंगाराम साळवी, मारूती आडखळे, मुकुंद धामणकर, चंद्रकांत तळेकर, महादेव जगताप तसेच अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version