| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील वानस्ते आणि पिटसई या दोन ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांची प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र अलिबाग व क्षयरोग पथक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींपैकी टी.बी.मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत निवड झालेल्या दोन ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा पार पडला.
या ग्रामपंचायतीमध्ये पिटसई येथील सरपंच विमल जगताप, ग्रामसेवक मनिषा कुंभार, आशा सेविका दर्शना कातूर्डे, समुदाय आरोग्य अधिकारी जिवन राठोड तसेच ग्रामपंचायत वानस्ते उपसरपंच शिवाजी गोठेकर, आशा सेविका सुषमा पवार, समुदाय आरोग्य अधिकारी निलेश कदम यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी तहसीलदार स्वाती पाटील यांनी तळा तालुका टीबीमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांना प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी तळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी स्वाती पाटील, तळा तालुका आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी रितेश शहा, लेखापाल निलांबरी म्हात्रे, पल्लवी शिंदे, समूहसंघटक नितीन ठाकूर, तालुका प्रयोगशाळा पर्यवेक्षक, पूजा कानिटकर, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र तळातील कर्मचारी नरेश नांदगावकर आदी उपस्थित होते.