विकासाला विरोध करणार्‍यांना शेकाप धडा शिकवेल

चित्रलेखा पाटील यांचा इशारा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकाप म्हणजे संघर्ष,शेकाप म्हणजे विकास कामे हे सूत्र रायगडात गेली अनेक वर्षे अवलंबिले करताना जर कुणी आम्हाला अडविणार असेल तर त्यांना लाल बावट्याचा दणका द्यावाच लागेल,असा इशारा रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे. चिंचोटी येथे उभारण्यात आलेल्या साकवाचे उद्धाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या. शेकाप च्या प्रयत्नाने संजय पाटील आणि योगेंद्र पाटील पाठपुराव्याने हे साकव उभारण्यात आले आहे.यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, विक्रांत वार्डे,मोहन धुमाळ,सुधीर पाटील, गिरीश तेलगे, जयवांत ठाकुर,नौशाद मुजावर,देवयानी पाटील,अंजली ठाकूर,बारक्याशेठ ठाकूर,प्रकाश खडपे,महेश झावरे,नासिर बेबन आदी उपस्थित होते.

चित्रलेखा पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून जिल्ह्याचा विकास शेकापमुळेच झाल्याचा दावा केला.भविष्यातही हा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे नमूद केले.विरोधकांचा घेताना मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे असताना तालुक्याच्या विकासाला निधी का आणला जात नाही,असा सवालही उपस्थित केला.केवळ राजकीय विरोधक म्हणून जर तुम्ही आम्हाला अडवत असाल तर आम्हीही शांत बसणार नाही,असे त्या म्हणाल्या.अनेकदा विकासकामे करताना अडवणूक कशी होते याचे उदाहरण त्यांनी दिले.कोरोना काळात शेकापतर्फे कोविड सेंटर सुुरु करताना तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी कशाप्रकारे अडवणूक केली याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.मात्र आ.जयंत पाटील यांच्या पुढाकाराने आम्ही ते सेंटर सुरु करुन यशस्वीही करुन दाखविले हेही त्यांनी सुचित केले.

Exit mobile version