शेकापचे अलिबागमधील पहिले नगरसेवक लतिफ घट्टे यांचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते अब्दुल लतिफ अब्दुल रेहमान तथा लतीफ घट्टे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दीर्घ आजाराने निवासस्थानी निधन झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ता पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते.

काँग्रेसची सत्ता असताना अलिबाग नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचे निवडून जाणारे ते पहिले नगरसेवक होते. अलिबाग मुस्लिम समाजाचे ते माजी अध्यक्ष होते. अलिबाग समाजवादी पक्षाचे अलिबाग तालुका अध्यक्ष अश्रफ घट्टे यांचे ते वडील होत.माजी नगरसेवक लतीफ घट्टे यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रामनाथ येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या निधनाबद्दल शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी शोक व्यक्त केला. काँग्रेसचे अलिबागमध्ये सम्राज्य असताना त्यांनी शेकापतर्फे लढत देवून विजय मिळवला. त्यांच्या निधनाने दुःख झाले असून त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version