शेलार मामांचे गाव कुडपणचा शेकाप विकास करणार; शेकाप नेते पंडित पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचे विर शिलेदार सुभेदार तानाजी मालसुरे यांच्या उमरठ गावाच्या विकासाचे स्व. प्रभाकर पाटील यांचे स्वप्न रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणल्याचे पाहून समाधान वाटले. यासाठी तत्कालिन पालकमंत्री प्रभाकरजी मोरे, माणिकराव जगताप यांचेदेखील योगदान आहे. आणि सध्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील गावाचा विकासात चांगल्या पद्धतीने केला आहे. डोंगराच्या कुशीत राहणार्‍या ग्रामस्थांना कधीही स्वप्नात देखील वाटले नसेल की कधी या गावात गाड्या येतील. मी नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली. भेटी वेळी असंख्य गाड्या तिथं होत्या. बरीच लोकं जे नोकरीनिमित्त अन्य भागात असतात, ते उपस्थित होते. गावात गेल्यानंतर पुरातन देवीचे मंदिर आहे. स्वच्छ असे मंदिर होते. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यावेळी गावाची पाण्याची योजना मार्गस्थ झाली. पण त्यावेळी आपल्याला तेथे जाण्याचा योग आला नाही. ग्रामस्थांशी चर्चा करीत असताना ग्रामस्थांनी सांगितले की हे जे गाव आहे ते तानाजी मालुसरे यांचे मामा शेलारमामा यांचे गाव आहे. त्याठिकाणी त्यावेळी शेलारमामांची बांधलेल्या समाधीचे दर्शन घ्यायचा मला योग आला. ग्रामस्थांना देखील ही समाधी शेलारमामांची आहे याची माहिती नव्हती. मात्र नजिकच्या इतिहास संशोधकांनी त्याचा शोध लावला. तेथे जाणारी पायवाट अत्यंत खराब अवस्थेत आहे. आज तानाजींवर चित्रपट आला. त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी, कलाकारांनी कोटयवधी रुपये कमवले. पण जो शेलारमामा यांनी प्रत्यक्ष तानाजींसोबत पराक्रम केला. त्यांच्या समाधीची अवस्था खराब आहे. मी ग्रामस्थांना आश्‍वासीत केले की आमचे नेते आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातू
उमरठ गावाप्रमाणेच कुडपण या गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करु. कुडपण हे गाव पर्यटनस्थळ म्हणून शासनाने जाहिर केले आहे. महाबळेश्‍वरच्या तोडीचे हे गाव आहे. मात्र विकासापासून ते आज वंचित आहे. आता रस्ता झालेला आहे. शासनाने फक्त पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करुन काही उपयोग नाही. त्यासाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. गावात अतिप्राचीन असे देवीचे मंदिर आहे. त्या देवीच्या मंदिराला लादी देखील नाही. मी ग्रामस्थांना आश्‍वासीत केले आहे की, या मंदिराचा जिर्णोध्दार आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून आम्ही करुन. गावात दोन तीन साकव आहेत. लोखंडी साकव आहेत. पर्यटक नेहमी येतात मात्र त्यांच्यासाठी सुविधा नाहीत. महाबळेश्‍वर आणि माथेरान या दर्जाचे हे पर्यटन स्थळ आहे. मला अभिमान वाटला. जिल्हा परिषदेत अध्यक्ष बरेच होऊन गेले. पण 5-6 वर्षांच्या कालावधीत स्व. प्रभाकर पाटील यांनी सत्तेचा वापर करुन या गावाचा विकास केला. मला निश्‍चित खात्री आहेत्र जसा उमरठ गावाचा विकास झाला तसा विकास शेलारमामांचे गाव असलेल्या कुडपणचा देखील व्हायला हवा. शेलारमामांची समाधी या गावात आहे हे अनेक शिवभक्तांना देखील माहिती नाही. मी अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषदेत देखील बराच काळ होतो. पण दुदैवाने त्या गावात जाण्याची संधी मला मिळाली नाही. पण आता मी या गावात गेल्यानंतर मी निश्‍चित शासनाकडे पाठपुरावा करुन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या गावाला जाण्यासाठी महाबळेश्‍वर मार्गे रस्ता होता. स्व. प्रभाकर पाटील पहिल्यांदा या गावात गेले तेंव्हा नद्या पार करुन गेले. प्रभाकर पाटील रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना आणि कुंडेराम मास्तर पंचायत समितीत असताना दुर्गम भागामध्ये अजिबात रस्ता नव्हता त्यावेळेस प्रभाकर पाटील यांनी स्टँडींग कमिटीची मिटींग घेऊन कुडपण हे गाव महाराष्ट्राच्या पुढे आले.कुडपण गावाला फार मोठा इतिहास आहे, तानाजी मालुसरे यांचे मामा शेलारमामा यांचे गाव कुडपण अत्यंत दुर्गम भागात होते.त्यावेळी रस्ता करणे शक्य नव्हते कारण त्यावेळी यांत्रिकीकरण काहीच नव्हते अशाही परिस्थितीत आदरणीय प्रभाकर पाटील याच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा परिषदेने त्यावेळी रस्ता केला. प्रभाकर पाटील यांनी त्यावेळेस अनेक विकासाची कामे केली,पोलादपूर तालुक्यातील अनेक दुर्गम गावांना रस्ते जोडले. मात्र त्यांचे राहिलेले स्वप्न शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात येईल. या भागात अनेकजण आमदार होऊन गेले. प्रभाकर मोरे, माणिकराव जगताप यांनी प्रयत्न केले. आता भरत गोगावले यांनी देखील प्रयत्न केला आहे. मात्र या गावात जाण्यासाठी रस्ता व्हायला हवा ही मागणी करणारा एकमेव नेता प्रभाकर पाटील होते. त्यावेळी जायला रस्ता नव्हता. शिडीवरुन लोकं कसरत करुन जा ये करायचे. शेकापक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या गावाल भेट दयायला हवी. काम कसे करायला हवे. तानाजी मालुसरे यांच्याबरोबर प्राणाची बाजी लावणार्‍या शेलारमामांच्या समाधीचे देखील दर्शन घ्यायला हवे. आणि या रायगड जिल्ह्यात अनेक रत्ने होऊन गेले. अनेक स्थळे आहेत जी विकासापसून वंचित राहिली आहेत. निश्‍चित आपल्या जाण्याने या गावाच्या विकासाला चालना मिळेल. राज्य शासनाने देखील या गावाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र फक्त जाहीर करुन फायदा नाही. पर्यटकांना आकर्षण वाटेल अशा सुविधा द्यायला हव्या. शेलारमामाची समाधी आहे हे समजल्यावर हजारो शिवभक्त दर्शन घेण्यासाठी जातील. मला या समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. गावात ग्रामस्थांचे पुरातन ग्रामदैवत आहे त्याचे देखील जिर्णोध्दार करण्यात येणार आहे. ती देवी आम्हाला निश्‍चितच आशिर्वाद देईल.

(शब्दांकन भारत रांजणकर)

Exit mobile version