म्हसळा तहसीलदार कार्यालयाचे स्थलांतर

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा तहसील कार्यालयाची सुमारे शंभर ते सव्वाशे वर्ष जुन्या इमारतीत तहसिलदार कार्यालय कार्यरत होते. वादळ किंवा अतिवृष्टीत इमारत केंव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. तहसिलदार कार्यालयाची इमारत क्र. 747, चे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीवर्धन यांचेकडून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये तहसिलदार कार्यालयाची इमारत धोकादायक असून, तहसिलदार कार्यालयाचे इतर इमारतीमध्ये स्थलांतर करण्याबाबत अभियंता यांनी सुचविले होते. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडील आदेशाने नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत सुरक्षेच्या कारणासाठी कार्यालय दिघी रोडवरील पाचगांव आगरी समाज संस्था या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे.

Exit mobile version