पेण | वार्ताहर |
शासना मार्फत यंदा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2020-21 कालावधीतील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून ग्रुपग्रामपंचायत शिहूचा पेण तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक व संपूर्ण रायगड जिल्हयात 821 ग्रामपंचायतीतून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल शिहूच्या सरपंच पल्लवी प्रसाद भोईर, माजी उपसरपंच सुजित गदमळे, उपसरपंच गिता अमृत कुथे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हापरिषद अध्यक्ष योगिता पारधी तसेच जिल्हापरिषद मुख्याधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पारितोषिक प्रदान करण्यात आले . ते प्रतिनिधिक स्वरूपात पेण पंचायत समिती सभापती मनीषा भोईर व गटविकास अधिकारी एम.एन.गढरी यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आला.