पनवेलमध्ये तरुणाई साकारते शिवनेरी किल्ला

| पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागवण्यासाठी पनवेलमध्ये तरुणाईने यंदाच्या वर्षी सुद्धा स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली तो शिवनेरी किल्ला उभारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन कट्टा परिवार हि संकल्पना सुरु केली आहे. त्या अनुषंगाने ते यंदाही किल्ला उभारत आहेत.

शहारातील विरुपाक्ष मंदिरासमोरील पटवर्धन वाडा येथे मोकळ्या जागेत दररोज 16 ते 20 तरुण-तरुणी आपले शिक्षण व उद्योगधंधा सांभाळीत सायंकाळी सदर ठिकाणी एकत्र येऊन हा किल्ला उभारण्याचे काम गेल्या 20 दिवसांपासून करीत आहेत. यासाठी ते स्वतःच्या खिशाला चाट देऊन ठराविक रक्कम जमा करून किल्ला उभारणीसाठी आपले योगदान देत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून हि तरुणपिढी अश्याप्रकारे हे वेगवेगळे किल्ले उभारीत आहेत. पहिल्या वर्षी त्यांना आयोजित किल्ले स्पर्धेत तृतीय बक्षीस मिळाले होते.

तर मागील वर्षी द्वितीय मिळाले होते. तर यंदा प्रथम क्रमांक पटकण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष प्रभंजन गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे कट्टा परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य असे 8 बाय 6 फुटी असे पोट्रेट बनवणार असून सदर पोट्रेट किल्ल्याच्या बाजूला ठेवण्यात येणार आहे त्यामुळे या किल्ल्याची शोभा आणखी वाढणार असल्याची माहिती सदस्य अमिनेश पटवर्धन यांनी दिली.

Exit mobile version