। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपलिका हद्दीतील वावंजे रस्ता (गोडा आंबा) येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्याबद्दल व नाळयाची साफसफाई करून नवीन नाळयाचे बांधकाम करण्यासंदर्भात शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी महापालिकेचे प्रभाग 2 प्रभाग अधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी त्यांच्या समवेत उप तालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, रामलखन प्रसाद, परशुराम गायकर, आर.के. पटेल, किसमत अली, विष्णुशंकर पांडे, अंकित सिंह, मोहम्मद उमर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. वावंजे (गोडाआंबा) येथील महानगरपालिका क्षेत्रातील हद्दीमध्ये रस्त्यावर पाणी, नाळे उघडे सर्व काही घाणीचे सम्राज्य आहे. त्यामुळे तेथे व्यवसाय करणा-या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याची आपण तातडीने दखल घेऊन रस्त्यावर साचलेले पाणी, नाळ्याची साफसफाई करून नवीन नाळयाचे बांधकाम करावे व नागरीकांना होणार्या त्रासापासून मुक्तता करावी, असेही या निवेदनात अधोरेखित केले आहे.