। वैभववाडी । प्रतिनिधी ।
शिवसेनचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. तर या चौकशीमागे भाजपाचा हात आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच मी कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असं वैभव नाईक म्हणाले.
ए.सी.बी.कडे कोणीतरी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर काल मला चौकशीसाठी हजर राहण्याचे एक समन्स मिळाले. प्राथमिक चौकशी देखील माझ्याकडे केली गेली. त्यांना जी माहिती हवी आहे, ती सर्व माहिती मी त्यांनी सांगितलेल्या मुदतीच्या आतच देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन आणि त्यांना योग्य माहिती देईन.