शिवशक्ती महिला संघाचे विजयात सातत्य

मुंबई पोस्टलची हंगामाची विजेतेपदाने सुरुवात

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवशक्ती महिला संघाने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. शिरोडकरचा 34-33 असा निसटता पराभव करीत शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या महिला गटात विजयाचे सातत्य राखले. यास्पर्धेत सहभागी झाल्यापासून त्याने जेतेपद आपल्या हातून निसटू दिले नाही. या विजय बरोबरच त्यांनी स्व. मोहन नाईक चषक व रोख रु. पंधरा हजार रुपयांचे परितोषिक पटकावले. उपविजेत्या शिरोडकरला चषक व रोख रु. दहा हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शिवशक्तीच्या समृद्धी भगतला रोख रु. पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

मुंबई पोस्टलने प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात यंदाच्या मोसमाची सुरुवात विजेतेपदाने केली. पोस्टलने हिंदुजा रुग्णालय संघाचा प्रतिकार 40-30 असा मोडून काढत स्व. मोहन नाईक चषक व रोख रु. पंधरा हजार रुपये देण्यात आले. पोस्टलच्या सौरभ कुलकर्णीने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे रोख रु. पाच हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. पोस्टलचा तेजस कदम स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे, तर हिंदुजा संघाच्या अनिकेत मिटकेला उत्कृष्ट चढाईचा खेळाडू म्हणून रोख रु. दोन हजार पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका सुयोगी नाईक, स्पर्धा निरीक्षक दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version