| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील पळस येथील जय भवानी क्रिकेट क्लब व शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीने, रविवार (दि.1) पळस येथील मुंबई गोवा महामार्गा शेजारील पटांगणावर आयोजिलेल्या भव्य दिव्य अशा कै. किशोर भालेकर स्मृती चषकाचा मानकरी शिवशंभू वरप संघ ठरला आहे. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक काळभैरव कार्ली संघ, तृतीय क्रमांक जयभवानी पळस संघ तर चतुर्थ क्रमांक हॉली क्रॉस कार्ली संघ यांनी पटकाविला. अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच दीपक कदम(वरप संघ) यांस देण्यात आले. तसेच स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज विनायक खोपरे (वरप संघ), उत्कृष्ट फलंदाज ज्ञानेश्वर शिर्के (कार्ली संघ), उत्कृष्ट गोलंदाज प्रणित शिर्के (पळस संघ) आदींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
जय भवानी क्रिकेट क्लब पळस आयोजित क्रिकेट स्पर्धच्या उदघाटन व बक्षीस वितरणा प्रसंगी शिवराम शिंदे, विक्रांत घासे, हिराजीभाऊ शिंदे, चंद्रकांत भालेकर, राजेंद्र शिंदे, योगेश विचारे, संतोष भालेकर, निष्ठा विचारे, बबन शिंदे, बबन भालेकर, प्रकाश कदम, दिनेश इंद्रे, परशुराम शिर्के, विजय विचारे, मनोज शिंदे, मोरेश्वर भालेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवशंभू वरप संघ विजयी
