रसायनीतील श्लोकला सुवर्णपदक

| रसायनी | वार्ताहर |

नाशिक येथे दिनांक 18 ते 20 मे रोजी पार पडलेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टॉप फोर महाराष्ट्र या स्पर्धेत रसायनी येथील रायगडचा खेळाडू श्लोक माळी याने पहिल्याच दिवशी आपली छाप सोडली. त्याने हरियाणाच्या खेळाडूवर सरळ दोन राऊंडने मात करुन सेमी फायनलमध्ये मुंबईच्या अंशचा 14/0-12/2 असा परभव केला. अंतिम सामन्यात त्याने गुजरातच्या आरव सकल याचा 11/5-16/8 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे त्याने रसायनीसह रायगड जिल्हाच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

दरम्यान, श्लोकला त्याचे वडील म्युचुर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव सचिन माळी मार्गदर्शन करत आहेत. रसायनीसह रायगड जिल्ह्यात त्यांनी असे बरेच राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. श्लोकला त्याच्या विजयाबद्दल म्युचुर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्ष ॲड. प्रज्ञा भगत व अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमी रसायनीचे अध्यक्ष संदीप मुंढे यांनी विशेष अभिनंदन केलं आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला आहेत.श्लोक माळी याच्या सुवर्ण कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version