कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
। कर्जत । प्रतिनिधी ।
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना फसवून शिंदे गटात गेलेले सुनिल पाटील यांच्या ताकई गावातील राकेश पाटील यांच्यासह असंख्य तरूणांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. कर्जत शहराचा मोठा नेता म्हणून मिरवणार्या सुनिल पाटील यांना हा मोठा धक्का असून कर्जत विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांची ताकद वाढली आहे.
सुनिल पाटील हे ठाकरे गटातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत सुनिल पाटील यांनी माघार घेत नितीन सावंत यांना निवडून आणण्याचा शब्द ठाकरे यांना दिला होता. परंतु, आठवड्यातच सुनिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना फसवून शिंदे गटात प्रवेश केला. या नाट्यमय घटनेने सुनिल पाटील यांच्या विरोधात सकल मराठा समाज, खोपोली शहरातील सर्वसामान्य जनता, तरूण वर्ग नाराज झाली होती. यामुळे नितीन सावंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत ताकई गावातील युवानेते राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरूणांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात जाहिर पक्षप्रवेश केला.
यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, जगदीश ठाकरे, संपत हडप, योगेश घोलप, भरत पिंगळे आदी उपस्थित होते.