। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे, अकोला, ठाणे येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहे. अशीच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (दि.15) घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर आपली चिमुरडी मुले शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. मुलींना शाळेत पाठवायचं कि नाही हा मोठा प्रश्न पालकांना समोर आहे.