धक्कादायक! अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल

| मुंबई | प्रतिनिधी |

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चनयांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांना आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 81 वर्षीय अमिताभ बच्चन यांना आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाज दाखल करण्यात आले. मात्र, अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण झाले होते. मात्र, त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत सगळ्यांचे आभार असे असे ट्वीट केले.

Exit mobile version