धक्कादायक! महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

| महाड | प्रतिनिधी |

महाडमधील एका अल्पवयीन मुलीवर 21 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्याने हा निंदनीय प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी त्याच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज तांबे (21) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या बहिणीच्या महाड येथील बिरवाडीमधील आदर्श नगर येथील घरात या पुर्वी जूलै 2022मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर 11 जून 2025 रोजी दुचाकीवर नेऊन महाड-रायगड रस्त्यावरील एका अज्ञात गावात नेऊन तिला मारहाण केली. तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मोबाईलवर अश्लील चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे. आरोपीसह त्याला सहकार्य करणाऱ्याच्या पोलीस शोधात आहेत. मात्र, आरोपीच्या बहिणीसह दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत आहेत.

Exit mobile version