| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वरील कचऱ्याच्या डब्ब्यात एक नवजात बाळ आढळले असून, ही घटना मंगळवारी (दि.25) रात्री 10.30 वाजता घडली आहे. ह्या घटनेमुळे विमानतळावर हळहळ व्यक्त केली गेली. अधिकाऱ्यांनी त्वरित बाळाला कूपर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बाळाला येथे कोणी व का सोडले याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून आणि त्यांचा प्राथमिक लक्ष बाळाची ओळख पटवण्यावर आहे. त्यांनी बाळाची कुटुंबीयांची किंवा संबंधित व्यक्तींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलिस तपासात त्या बाळाचे कुटुंब, बाळासंबंधित इतर माहिती याचा शोध घेणार आहेत. अधिक तपास आणि माहिती मिळवण्यासाठी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते आणि गुन्ह्याचा शोध घेत आहेत.