धक्कादायक! ट्रकचा टायर फुटून अपघात, रिक्षा चालकाचा मृत्यू

। मुंबई । वार्ताहर ।
ऐरोली येथील दिवा सर्कल येथे रात्री एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकचा तयार फुटल्याने ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. टायर फुटल्याने हा ट्रक पलटी होऊन थेट एका ऑटो रिक्षा वर कोसळला. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. ट्रक ओव्हरलोअड असल्यानेच टायर फुटून अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
या अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं ट्रक बाजूला घेण्यास सुरुवात केली होती. या भीषण अपघातामुळे नवी मुंबईतील अपघाताचं सत्र सुरुच असल्याच पुन्हा एकदा अधोरेखित झालाआहे.

Exit mobile version