| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
रत्नागिरी शहरानजिकच्या कुर्ली येथे तरुणाने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना गुरुवारी सुमारास उघडकीस आली आहे. बहर नरेंद्र तोडणकर (34) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गुरुवारी (दि.29) दुपारी कुर्ली येथील विजपुरवठ्या संबंधी महावितरणचे कर्मचारी बहरच्या घरी गेले. तेव्हा घराचा दरवाजा कोणीही उघडत नव्हते. त्यामुळे शेजार्यांनी बहरच्या छोट्या भावाला फोन केला असता त्याने घराचा दरवाजा तोडून पहा असे त्यांना सांगितले. शेजार्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला त्यांनंतर बहर घरातील लोखंडी पाईपला वायरने गळफास घेतलेला दिसून आला.