मनू भाकरने हात उंचावून केले अभिवादन
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. आपले अॅथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. अनेक पदकं भारताला मिळाली पाहिजेत, असे मत मनू भाकरने व्यक्त केले आहे. मनू भारतात परतल्यानंतर तीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मनूनेही हात उंचावून सर्वांना अभिवादन केले.
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं तिने जिंकली आहेत. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारांमध्ये कांस्य पदक जिंकले. आज ढोल ताशांच्या गजरात मनूचे जोरदार स्वागत केले. यावेळी हात उंचावून मनूने अभिवादन केले. भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकर पदकांची हॅटट्रिक साधण्यापासून थोडक्यासाठी चुकली. पॅरिस ऑलिम्पिकच्या (2024) 25 मीटर पिस्तूलमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. शेवटच्या क्षणी ती टॉप-3 मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्णपदकाची दावेदार होती. मनूने सुरूवातीला 5 पैकी 2 शॉट लगावत फारशी चांगली सुरूवात केली नाही. ती सहाव्या स्थानावर होती, पण नंतर 5 पैकी 4 गुण तिने गाठले. मग ती चौथ्या स्थानावर पोहोचली आणि इथून तिने जबरदस्त कमबॅक केले. पण अखेरच्या सीरिजमध्ये ती एका शॉटपासून चुकली. मात्र, तिच्या या कामगिरीचे प्रचंड कौतुक होत आहे. महिलांच्या फायनलमध्ये मनूने 28 गुण मिळवले आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यास ती चुकली. तिला शूटऑफमध्ये कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या वेरोनिका मेजरकडून पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मनूने 10 मीटर एअर पिस्तुल एकेरी आणि मिक्स्डमध्ये सरबज्योत सिंगसह दोन कांस्यपदके जिंकली. पूर्वी, कोणत्याही भारतीय खेळाडूने (स्वतंत्र भारत) एकाच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकलेली नाहीत.
दरम्यान, ढोल ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आल्याने ती भारावून गेली होती. मनूने खास शब्दांमध्ये सर्वांचे आभार व्यक्त केले.