रायगडात अक्षय तृतिया खरेदीला अल्प प्रतिसाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी दागीन्यांसह अन्य वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. शनिवारी (दि. 22 ) रोजी अक्षय तृतीया निमित्त सोने खरेदीसह दुचाकी खरेदीवर भर दिला. कोट्यवधी रुपयांची खरेदी झाली असली, तरीही मात्र दुचाकी खरेदीला ग्राहकांकडून प्रतिसाद अल्प मिळाला असल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली. गत अक्षय तृतीयापेक्षा यावर्षी अक्षय तृतीयनिमित्ताने होणारी खरेदी 50 टक्के कमी झाली असून मोठी आर्थिक झळ व्यावसायिकांना बसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीसह जागा, फ्लॅट तसेच वेगवेगळ्या वस्तू खरेदी अधिक केली जाते. अक्षय तृतीया निमित्त शनिवारी सकाळी व संध्याकाळी दागिने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होती. दागिन्यांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने खरेदीचे प्रमाणही कमी झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. अक्षयतृतीया निमित्त अनेकांनी वेगवेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली. तर काहींनी जमीन, फ्लॅट खरेदी केले. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांची दुकाची वाहने खरेदी करण्यावर भर दिला. परंतू यंदा फक्त सुमारे दोनशेच दुचाकी खरेदी झाल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली. त्यात होन्डा कंपनीचे 50 व हिरो कंपनीचे 50 दुचाकींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. अक्षय तृतीयाला मागच्यावर्षी गर्दी होती. परंतु यंदा 50 टक्केच प्रतिसाद मिळाला. कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असली, तरीही वाहनांची विक्री कमी झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

गतवर्षी अक्षय तृतीया निमित्त दुचाकी खरेदीला प्रतिसाद मिळाला. त्याच्यापेक्षा 50 टक्के प्रतिसाद या अक्षय तृतीयाला मिळाला. अलिबागमधून फक्त वीसच दुचाकी खरेदी झाल्या आहेत.

नवीन झा, व्यवस्थापक, होंडा  शो रुम
Exit mobile version