| तळे । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी कष्ट आणि मेहनत केली पाहिजे, असे प्रतिपादन तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले. ते तळे येथील उर्दू हायस्कूल मधील विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमास नजीर कडू, महंमद परदेशी, अब्दुल्ला खानदेशी, महंमद खान पठाण, सज्जाद चोगले, अब्दुल्ल रज्जाक लोखंडे हे उपस्थित होते. संविधान दिना संदर्भात शिक्षिका करुणा पातेरे यांनी उत्तम माहिती देऊन विद्यार्थ्यांना शप्पथ दिली. या सर्व मुलांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अकेम सतवारे, इस्माईल खोपटकर, बावा गोलंदाज, हसनमियाँ परदेशी, शौकत राऊत, इकबाल चोगले, शेख महंमद गोठेकर व महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शब्बीर खान यांनी तर आभार प्रदर्शन अब्दुल रज्जाक लोखंडे यांनी उत्तम प्रकारे केले.