| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, आयपीएलच्या उर्वरित हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी तो सज्ज आहे. मुंबईच्या 26 वर्षीय श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली. इंग्लंडमध्ये श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) श्रेयस तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यावर त्याला आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, श्रेयस परतल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद पुन्हा त्याच्याकडे सोपवण्यात येणार की यष्टीरक्षक ऋषभ पंतच नेतृत्वाची धुरा वाहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत ङ्गआयपीएलफच्या उर्वरित हंगामाला प्रारंभ होणार आहे.