। श्रीवर्धन । वार्ताहर ।
प्रतिवर्षीप्रमाणे श्रीवर्धन येथील श्री सोमजादेवी देवस्थान ट्रस्टतर्फे सोमवार (दि.20) ते मंगळवार (दि.28) या कालावधीत श्री सोमजादेवी रथ उत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये दररोज अखंड भजन, पहाटे 5 वा.काकड आरती, सकाळी 11.30 ते दु.3.30 पर्यंत महाप्रसाद, रात्री 12 वा. रथयात्रेला प्रारंभ व दि. 28 रोजी दुपारी 12 वा.नंतर रथयात्रा सांगता सोहळा असा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी ग्रामदेवतेच्या रथ उत्सव सप्ताहानिमित्त होणार्या सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.