नारळ फोडी स्पर्धेत श्रीवर्धनचा अनंत फुटणकर, मधुकर काटकर विजयी

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेकाप राज्य सोशल मीडिया प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील पुरस्कृत, चौल विभाग मित्रमंडळ आयोजित नारळफोडी स्पर्धेत श्रीवर्धनचे अनंत फुटणकर आणि चौलचे मधुकर काटकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. रविवारी (दि. 27) ही स्पर्धा चौल नाका येथील मराठी शाळेच्या पटांगणावर पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनंत फुटणकर श्रीवर्धन- मधुकर काटकर, द्वितीय क्र. कल्पेश खारकर चौल-जाखमाता, निलेश खोत, तृतीय क्र. माऊली कृपा चौल-शितलादेवी संघमालक प्रथमेश गुरव, जयंवत नागवेकर यांनी पटकाविला. स्पर्धेत उत्कृष्ट मारेकरी म्हणून निलेश नाईक यांस गौरविण्यात आले. दरम्यान, लकी ड्रॉ स्पर्धेत राज बळी, राकेश पाटील यांनी बक्षीस पटकाविले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित पाटील, चंद्रकांत धाटावकर, मंगेश काटकर, जयवंत पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी सुरेश खोत, मधुकर काटकर, रमेश नाईक, निलेश नाईक, जयवंत नाईक, सुधाकर म्हात्रे, प्रशांत जाधव, हेमंत पाटील, रमेश म्हात्रे, निलेश खोत, प्रफुल्ल पाटील, शरद वरसोलकर, एस.पी. ठाकूर, नितीन पराड आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन तेजेश शिंदे, राजेंद्र ठाकूर यांनी केले.

Exit mobile version