शुभम उगले विद्यापीठात प्रथम

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जतचा शुभम शैलेश उगले कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सरळगाव येथे शिक्षण घेत होता. त्याने बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) विद्या शाखेत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

शुभम उगले हा कर्जत शहरातील म्हाडा वसाहतीत राहात असून, त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. त्याला 10 वीला 93 टक्के, तर बारावीच्या विज्ञान शाखेत 85 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सरळगाव-मुरबाड येथे शिक्षण घेतले. त्याने बी. टेक ( फूड टेक्नॉलॉजी ) विद्या शाखेत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याला त्याची आई सौ. शीतल, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रा. रणजीत कोकणी तसेच त्याची बहीण शिवाणी यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या 41 व्या पदवीदान समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version